बुलढाणा (हॅलो बुलडाणा) दिवसागणिक अपघाताचे प्रमाण वाढत असून आता थोड्या वेळापूर्वी बोथा घाटात फोर व्हीलर चा अपघात झाल्याची बातमी हाती आली आहे.हा अपघात इतका भीषण झाला की फोर व्हीलर पूर्णता क्षतिग्रस्त झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.बुलढाणा शहरातील सर्वांचे परिचित संभाजीनगर येथील अजय परांडे असे या जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्यावर खामगाव येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. सदर अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.
- Hellobuldana