चिखली (हॅलो बुलढाणा) लोकमतचे तालुका प्रतिनिधी सुधीर चेके पाटील यांचे वडील कै. विश्वनाथ शिवराम चेके पाटील यांचे आज रविवार, 28 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चेके पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार व पत्रकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कै. विश्वनाथ चेके पाटील यांचा अंत्यविधी आज दुपारी 1 वाजता राऊतवाडी स्मशानभूमी, चिखली येथे पार पडणार आहे. आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवाराने याची नोंद घ्यावी.
हॅलो बुलढाणा परिवारातर्फे बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.










