spot_img
spot_img

देऊळगाव राजात धक्कादायक प्रकार! हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ; लाकडी दांड्याने मारहाण, गुन्हा दाखल

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) शहरातील दुर्गापुरा परिसरात अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी संदीप दशरथ ससाने यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास फिर्यादी हे आरोपी लक्ष्मण कोल्हे यांच्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीने फिर्यादीला जातिवाचक शब्द वापरून अपमानित केल्याचा आरोप आहे. “ताट उचल” असे म्हणत शिवीगाळ करण्यात आली. फिर्यादीने शिवीगाळ करू नका असे सांगितले असता आरोपीने आणखी अपमानास्पद आणि अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर आणि मनगटावर दुखापत झाली आहे. या प्रकरणी कायम अप.क्र. 295/2026 अंतर्गत BNS कलम 118(1), 296, 352, 351(2), 351(3) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!