spot_img
spot_img

देऊळगावराजाच्या मेहुणाराजा गावचा वीरपुत्र शहीद; अंकुश महादेव मिसाळ यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील संत चोखामेळा जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहुणा राजा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावचे वीरपुत्र, ३३ मिडीयम रेजिमेंटचे शूर जवान अंकुश महादेव मिसाळ यांना जम्मू-काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना दि. २६ जून २०२६ रोजी वीरमरण प्राप्त झाले.

देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिल्याने संपूर्ण गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. अंकुश मिसाळ यांच्या वीरमरणाची बातमी समजताच मेहुणा राजा परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात अभिमान दाटून आला. मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या या शूर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.

शहीद जवान अंकुश महादेव मिसाळ यांचा अंत्यविधी दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मेहुणा राजा येथे शासकीय इतमामात होणार आहे.ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि मिसाळ कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!