बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी विधानसभा निवडणुकीचे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी असून जिल्ह्यातील काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत परंतु उमेदवारी अर्ज भरताना ऐतिहासिक शक्ती प्रदर्शन पाहायचे असेल तर विद्यमान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड उद्या नामांकन दाखल करण्यात असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते व विकासपुरुष अशी ओळख असलेले आमदार गायकवाड उद्या दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.दरम्यान सर्व शिवसेना, युवासेना,भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच घटकपक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी आणि माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.