spot_img
spot_img

नावे गहाळ करण्याच्या षडयंत्रावर चिखलीचे तहसीलदार काय म्हणाले ? -ERONET या साफटवेअर मध्ये 2885 अर्ज मतदारयादीतून नांव वगळण्याबाबत अचानक झाले प्राप्त !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली विधानसभा मतदार संघातील मतदारयादीतून नांव गहाळ करण्याच्या षडयंत्राची चौकशी करणेबाबत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात 18 ऑक्टोबरला पत्र प्राप्त झाले होते, त्या अनुषंगाने
राजकीय पदाधिकारी तसेच नागरीकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. सदर सर्व पत्रे व निवेदनानुसार पडताळणी केली असता ERONET या साफटवेअर मध्ये 2885 अर्ज मतदार यादीतून नांव वगळण्याबाबत ऑनलाईन अचानक पध्दतीने प्राप्त झालेले असुन सदर अर्जाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की इतर जिल्हामध्ये विधानसभा मतदार संघामध्ये स्थलांतरणाचे अर्ज सादर केल्यामुळे 23 चिखली विधासभा मतदार संघामध्ये
वगळणीसाठी नमुना-7 GENERATE होत आहे. सदर अर्जाची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत
तपासणी केली असता सदर मतदारांनी स्वतः किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत नमुना-7 वगळणीचे अर्ज केलेले नाहीत. सदर अर्ज हे कोणी केले हे संबधीत मतदारांनासुध्दा माहिती नाही. तसेच यादी माहिती
ERONET साईट व ERO स्तरावर दिसत नाही. त्यावर अंतिम निर्णय घेणे प्रलंबित ठेवले आहेत. तसेच मतदारयादीतून कोणत्याही मतदाराची SOU MOTO वगळणी करण्यात आलेली नाही. व कोणत्याही पात्र मतदार
वगळलेला नाही याची खात्री केली आहे.उपसचीव व सह मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांचे पत्र
21/10/2024 नुसार विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा दि, 15/10/2024 रोजी करण्यात आली असल्याने प्राप्त
झालेल्या नमुना-7 च्या अनुषंगाने वगळणीची प्रकीया करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश प्राप्त झालेले आहेत. याबाबत मतदारांना आश्वस्त राहावे. 20/11/2024 रोजी होणा-या मतदान प्रक्रीयेत सहभागी होवुन मतदान करावे.असे आवाहन चिखली येथील सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!