spot_img
spot_img

बुलढाण्याच्या सत्ताधारी आमदाराची धमकी? महाराष्ट्रात कायदा कुठे गेला! प्रकाशकावर जीवघेणा दबाव, अटकेची मागणी पेटली; गृहमंत्र्यांना थेट सवाल! आमदारावर अटकेची कारवाई कधी? की सत्तेचे संरक्षण सुरूच राहणार? पँथर सेनेचा इशारा कडक! “केसालाही धक्का लागला तर…”!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कोल्हापूरमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून ( शिंदे गट ) शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या नावाने समोर आलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.या ऑडिओमध्ये प्रकाशकाला पाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत असून,यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेनंतर विरोधक तसेच सामाजिक संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, “सत्ताधारी आमदार असल्यामुळे कोणालाही धमकावता येणार का?” असा थेट सवाल विचारला जात आहे. गृहमंत्री आणि कोल्हापूर पोलिस प्रशासन किती तासात कारवाई करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, बुलढाणा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी संबंधित वादही पुन्हा चर्चेत आला आहे. “बुलढाणा शहरातील कमानीवर गडाचे नाव आणि आतमध्ये बियर बार,दारूची दुकाने नाही ते अवैध धंदे चालतात का?” असा सवाल उपस्थित करत शिवप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या नाव बदलाच्या मुद्द्यावरही राजकीय टोलेबाजी सुरू असून, “सत्ता असतानाही बदल का होत नाही?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पॅंथर सेनेचे अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी संतप्त शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “प्रकाशकाला धमकी देणे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. प्रकाशकाच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही गप्प बसणार नाही. निडरपणे लिहिणाऱ्याला कोणीही दाबू शकत नाही. आम्ही या प्रकरणाचा तीव्र निषेध करतो आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करतो.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची जलद गतीने अधिकृत चौकशी होऊन सत्य बाहेर येण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. राज्यातील राजकीय तापमान वाढले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!