दुसरबीड (हॅलो बुलडाणा/प्रदीप साळवे) येथील टोल नाका परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून एक मनोरुग्ण महिला अत्यंत हालअपेष्टा सहन करत भटकताना दिसत होती. मात्र, या गंभीर घटनेकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. अखेर समाजसेवेची जाणीव ठेवत डॉ. नंदकुमार पालवे यांच्या ‘सेवा संकल्प’ संस्थेने पुढाकार घेत या महिलेला सुरक्षित आश्रय मिळवून दिला.
या संपूर्ण प्रकरणात प्रवीण भाऊ गीते यांनी महत्त्वाची भूमिका बजावत संपर्क साधून मदत उभी केली. तसेच संदीप घुगे आणि बंडू सांगळे यांनी चार दिवस सातत्याने पाठपुरावा करत ही मोहीम यशस्वी केली. आज (दि. २२ एप्रिल) सेवा संकल्पची गाडी घटनास्थळी पोहोचताच अमोल भोसले आणि धीरज सरनाईक यांनी प्रत्यक्ष मदत करत त्या महिलेला संस्थेत दाखल करण्यात आले.
एकीकडे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मानवी जीवन धोक्यात असताना, दुसरीकडे काही समाजसेवकांनी दाखवलेली संवेदनशीलता आशेचा किरण ठरत आहे. डॉ. नंदकुमार पालवे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा सेवाभावी वृत्तीला ‘हॅलो बुलडाणा’चा सलाम!












Total Users : 3430350