spot_img
spot_img

रात्री ३ वाजता ५५ सीटर बस; फक्त तिघांसाठी सेवा – शेगाव संस्थानची अनोखी मानवता!

शेगाव (हॅलो बुलढाणा) सेवा आणि श्रद्धेचा संगम काय असतो, याचे जिवंत उदाहरण पुन्हा एकदा श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे पाहायला मिळाले आहे. अवघ्या तिघा प्रवाशांसाठी पहाटे ३ वाजता थेट ५५ सीटर बस उपलब्ध करून देत संस्थानने आपल्या सेवाभावाची वेगळीच छाप पाडली आहे.

ही प्रेरणादायी घटना प्राची नागपूरकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या शेगावमधील आनंद विहार भक्त निवास येथे मुक्कामाला होत्या. निवासाची स्वच्छता, शांत वातावरण आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे त्यांचा अनुभव आधीच समाधानकारक होता.

दरम्यान, त्यांची ट्रेन पहाटे ४ वाजता असल्याने त्यांनी रात्री ३ वाजता स्टेशनवर सोडण्याची विनंती केली. मात्र, केवळ १५ मिनिटांत संस्थानने थेट ५५ सीटर बसची व्यवस्था केली. विशेष म्हणजे, प्रवासी फक्त तीनच असतानाही कोणताही विचार न करता ही सेवा तत्काळ पुरवण्यात आली.

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात अशा प्रकारची तत्पर, निःस्वार्थ सेवा दुर्मीळ असल्याचे प्राची यांनी नमूद केले. “शेगाव संस्थानची सेवा, व्यवस्थापन आणि भक्तांप्रती असलेली निष्ठा खरोखरच प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या घटनेमुळे शेगाव येथील संस्थानाबद्दलची श्रद्धा आणखी दृढ झाली असून, सेवाभावाचा हा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

व्हिडिओ 

https://www.instagram.com/reel/DXB–BFAPMJ/?igsh=cXhkbG1mOHo1MXZr

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!