बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मतदारांची तब्बल पाच दिवसात दहा ते पंधरा हजार नावे वगळण्याचे षडयंत्र भाजपाने रचल्याचा आरोप उबठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केला आहे. चिखलीचे आमदार श्वेता महाले यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचे दिवस भरले आहेत.त्यांची घरी बसण्याची वेळ आलीय.सत्तेच्या जोरावर एवढे मोठे क्राईम त्या करीत असल्याने हा सत्ताधाऱ्यांच्या रडीचा डाव असल्याचे बुधवत म्हणाले आहे.
आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने षडयंत्र रचले असून याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांना करण्यात आलीय.या तक्रारीने निवडणूक आयोग देखील चक्रावला. आमदार श्वेता ताई महाले यांनी त्यांचे पती विद्याधर महाले यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून चिखली विधानसभा मतदारसंघातील यादीतून मुस्लिम, मागासवर्गीय व महाविकास आघाडी संदर्भातील मतदारांची नावे काढण्यासाठी षडयंत्र असल्याचा आरोप काल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला आहे.महाविकास आघाडीतील मतदारांची नावे वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात
ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेत. जिल्ह्यातील एकूण प्राप्त अर्जापैकी 80% ही नावे चिखली मतदारसंघातील आहेत.त्यामुळे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले.या प्रकरणावर आक्षेप घेण्याचा कालावधी देखील संपला आहे. भाजपा ने षडयंत्र रचण्याचा हा करेक्ट कार्यक्रम केला.असा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला.दरम्यान जालिंदर बुधवत यांनी देखील आमदार श्वेता महाले यांच्यावर निशाणा साधला आहे.ते म्हणाले की हा सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव असून कितीही नावे काढण्याचा व दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रेच निवडणूक जिंकणार आहे,हा इशारा समजावा !सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचा पराभव निश्चित असल्याची त्यांना समजले असल्याने नुसती उठाठेव करीत असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना तक्रार केली असून या संदर्भात निवडणूक आयोगाशी बोलणे झाल्याचे बुधवत म्हणाले.











