spot_img
spot_img

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांना का झिजवायचे कार्यालयांचे उंबरठे? ‘जाचक अटी हटवा, प्रक्रिया सुलभ करा!’ प्रवीण गितेंची जिल्हा परिषद CEO गुलाबराव खरात यांच्याकडे ठाम मागणी

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांच्या डिजिटायझेशन प्रक्रियेत नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा आता थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गिते यांनी जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांची भेट घेऊन जाचक अटी रद्द करत प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याची जोरदार मागणी केली.

जुन्या जन्म-मृत्यू नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून घेताना अनेक नागरिकांना विविध कागदपत्रे, जुने दाखले, स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांच्या प्रक्रियेमुळे वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. उपलब्ध शासकीय अभिलेख असताना नागरिकांवर अतिरिक्त कागदपत्रांचा भार टाकण्याऐवजी त्याच नोंदींच्या आधारे डिजिटायझेशन पूर्ण करावे, अशी मागणी गिते यांनी केली.

जुने प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती कमी करणे, पर्यायी पडताळणी यंत्रणा उभी करणे आणि प्रलंबित अर्जांचा वेळबद्ध निपटारा करणे, या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!