spot_img
spot_img

BREAKING! मेरा चौकीजवळ अज्ञात वाहनाची धडक… वडील जागीच ठार, अडीच वर्षांच्या चिमुकलीसाठी सुट्टीवरचा पोलीस धावला!

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) चिखली–जालना महामार्गावर मेरा चौकीजवळ आज, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत रवी भीमराव बोरकर (वय ३९, रा. पुंडलिक नगर, चिखली) यांचा जागीच मृत्यू झाला. चिखलीहून देऊळगाव राजाकडे जाताना झालेल्या या अपघातात त्यांची अडीच वर्षांची मुलगी जखमी झाली.

त्याच मार्गाने जात असलेले अंढेरा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ सोनकांबळे सुट्टीवर होते. मदतीला कुणी पुढे येत नसल्याचे पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चिमुकलीला स्वतःच्या गाडीतून सोबत वेदांत शालिग्राम चव्हाण यांनी चिखलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुंडलिक नगरचे नगरसेवक दत्ता सुसरही घटनास्थळी पोहोचले होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!