spot_img
spot_img

वाहनधारकांसाठी खुशखबर! चारचाकी वाहनांसाठी MH28 CJ नवी मालिका सुरु; 19 ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील चारचाकी वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा (RTO) ने चारचाकी वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी नवी नोंदणी मालिका सुरु केल्याचा आदेश जारी केला आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे यांनी दि. 19 ऑक्टोबर 2026 रोजी कार्यालयीन आदेश क्रमांक 320/2026/आस्था/उप प्रापकाबुल/389 अन्वये ही घोषणा केली आहे.

मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रक क्रमांक 19919/नोंदणी नविन/का2/दि- 28/06/1989 च्या संदर्भानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशानुसार, या कार्यालयात दिनांक 19.10.2026 पासून चारचाकी वाहनाच्या पसंती क्रमांकासाठी MH28 CJ ही नवीन मालिका क्रमांक 0001 ते 9999 पर्यंत सुरु करण्यात येत आहे. यापूर्वीची MH28 ची मालिका संपल्यामुळे आता नव्याने चारचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना MH28 CJ या सिरीजमध्ये आकर्षक आणि पसंतीचे नंबर मिळणार आहेत. ज्यांना आपल्या वाढदिवसाचा, लग्नाच्या वाढदिवसाचा किंवा इतर लकी नंबर हवा आहे, त्यांना आता 0001 ते 9999 या क्रमांकात अर्ज करता येणार आहे.
या निर्णयामुळे बुलढाणा RTO मध्ये चारचाकी वाहनांची नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून, वाहनधारकांना नव्या सिरीजचा लाभ घेता येणार आहे. आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!