spot_img
spot_img

EXCLUSIVE नऊ रात्रींचा जल्लोष, हजारो पावलांचा एकच ठेका अन् बुलढाणेकरांच्या मनात अविस्मरणीय आठवणी! बुलढाणा अर्बन – ‘हॅलो बुलढाणा’च्या गरबा महोत्सवाची दिमाखदार सांगता; भाईजींच्या संकल्पनेला डॉ. सुकेश झंवर, कोमलताई झंवर अन् संपूर्ण टीमच्या मेहनतीने यशाचा कळस!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ढोल-ताशांचा गजर… दांडियाचा थरार… रंगीबेरंगी वेशभूषेतील तरुणाईचा उत्साह अन् देवीच्या भक्तीत न्हाऊन निघालेले हजारो गरबाप्रेमी! सलग नऊ दिवस बुलढाणेकरांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या बुलढाणा अर्बन -‘हॅलो बुलढाणा’ गरबा महोत्सव २०२६ ची नवव्या माळेला अभूतपूर्व उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात यशस्वी सांगता झाली. १९ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या या महोत्सवाने पुन्हा एकदा बुलढाण्याच्या सांस्कृतिक वैभवावर सुवर्णमोहोर उमटवली!

बुलढाणा अर्बन, हॅलो बुलढाणा आणि सिटी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवामागे बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक (भाईजी) यांची दूरदृष्टी, अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांचे मार्गदर्शन आणि सहकार विद्या मंदिर तथा गरबा महोत्सवाच्या अध्यक्षा कोमलताई झंवर यांचे नियोजन मोलाचे ठरले.

नवव्या माळेच्या समारोप सोहळ्याला नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, नगरपरिषद गटनेते कुणाल गायकवाड व त्यांच्या पत्नी, डॉ. सुकेश झंवर, कोमलताई झंवर, कार्याध्यक्ष अॅड. जितेंद्र कोठारी, माधव काटे आणि राजेंद्र कायस्थ यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

महोत्सवाच्या आठव्या माळेला प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे यांच्या उपस्थितीने रंगत आणखी वाढली होती. तर नवव्या माळेला गरबाप्रेमींच्या उत्साहाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ‘निसर्ग वाचवा’ या सामाजिक संदेशामुळे महोत्सवाने पर्यावरण संवर्धनाचेही भान जपले.

या भव्य आयोजनाच्या यशामागे अॅड. जितेंद्र कोठारी, अनंताभाऊ देशपांडे, संजय कस्तुरे, नरेंद्र शर्मा,सुधीर भालेराव, मोरेश्वर जोशी,मोहन दलाल,गजानन चवरे,अनिल महाले,चेतन कोठारी, शुभम कायस्थ,गजानन रिंढे, यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीचे अथक परिश्रम महत्त्वपूर्ण ठरले. लालाभाई वाधवानी यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने नऊ दिवस कार्यक्रमात रंगत भरली.

नऊ दिवसांचा उत्सव संपला… पण बुलढाणेकरांच्या मनात आनंदाचा ठेका कायम राहिला! संस्कृती, भक्ती, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम घडवणारा हा महोत्सव पुढील वर्षाच्या नव्या उत्सुकतेची शिदोरी देऊन संपन्न झाला!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!