spot_img
spot_img

झाडं तोडणाऱ्यांनो, आता तरी जागे व्हा! बुलढाण्यात ‘ग्रीन इंडिया मिशन’ची हरित क्रांती; एकाच दिवसात तब्बल एक हजार फळझाडांचे मोफत वाटप!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि निसर्गाचा ढासळता समतोल… अशा गंभीर परिस्थितीत पर्यावरण वाचवण्यासाठी ‘ग्रीन इंडिया मिशन’ने बुलढाण्यात हरित क्रांतीचा नारा दिला आहे! मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी शहरातील जयस्तंभ चौकात तब्बल एक हजार फळझाडांचे मोफत वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

केवळ घोषणा नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून निसर्गरक्षणाचा आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रीन इंडिया मिशनने हा उपक्रम राबविला. नागरिकांना विविध फळझाडांचे वाटप करताना त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.झाडे लावून फोटो काढणे सोपे; पण ती जगवणे हीच खरी निसर्गसेवा! हा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

विशेष म्हणजे, ग्रीन इंडिया मिशनचा उद्देश केवळ रोपवाटपापुरता मर्यादित नसून वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याचा आहे.हरित आणि सुंदर बुलढाण्यासाठी आगामी काळातही पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!