spot_img
spot_img

BIG BREAKING! ‘आधी स्वतःच्या घरात पाहा… प्रत्येकाचे व्हिडिओ माझ्याकडे!’ महालेंना गायकवाडांचा थेट इशारा; भर पत्रकार परिषदेत कथित ‘अश्लील व्हिडिओ’ दाखवत आरोपांचा भडिमार! महालेंच्या कुटुंबावरही निशाणा; हप्तेवसुली, RSS जमीन अन् ड्रग्स प्रकरणावरून आरोपांची सरबत्ती – ‘धमकीचा पुरावा द्या, उद्याच आमदारकीचा राजीनामा देतो!’ गायकवाडांच्या आव्हानाने राजकीय संघर्ष पेटला!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड आणि आमदार श्वेता महाले यांच्यातील संघर्षाने आता टोक गाठले आहे. पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी कथित डान्सबार व्हिडिओ दाखवत पोलीस हप्तेवसुली,जमीन व्यवहार, ड्रग्स प्रकरण आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या संपत्तीबाबत गंभीर आरोप केले.महिलेला उचलून नेण्याची धमकी दिल्याचा पुरावा सादर केल्यास उद्याच आमदारकीचा राजीनामा देण्याचे आव्हानही त्यांनी दिले.

“मी धमकी दिल्याचा फोनवरील संभाषणाचा अथवा अन्य पुरावा आणून दाखवा; उद्या राजीनामा देतो,”असे गायकवाड म्हणाले. महिलांना मेसेज पाठविल्याच्या आरोपांबाबतही त्यांनी पुराव्याची मागणी केली.

उपविभागातील नऊ पोलीस ठाण्यांकडून दरमहा प्रत्येकी एक लाख रुपये गोळा करण्याची जबाबदारी बुलढाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्यावर दिल्याचा आरोप त्यांनी केला.मुख्यमंत्र्यांच्या नावाने पैसे जमा केले जात असल्याचा दावा करत, “पैसे दिले की नाही,रेकॉर्ड काढा,” अशी मागणी केली. अवैध दारू, क्लब,वेश्याव्यवसाय व इतर बेकायदा धंद्यांना मोकळीक देण्याच्या बदल्यात पैसे मागितले जात असल्याचेही त्यांनी आरोपात म्हटले.

या गोष्टी पोलीस अधीक्षकांना माहिती नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा; माहिती असूनही मौन बाळगले असल्यास त्यामागची मजबुरी काय,असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.

चिखलीतील गोरक्षणवाडी परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षित कथित ३० एकर जमीन कोणी घेतली,असा प्रश्न त्यांनी महालेंना विचारला. ३०० कोटी रुपये जमा केल्याचाही आरोप करत मुख्यमंत्र्यांना बदनाम केले जात असल्याचे म्हटले. आणखी गंभीर विषय सरकारपर्यंत आणि विधानसभेपर्यंत नेण्याचा इशारा देत, “सगळे गंदे अंडे त्यांच्याकडे आहेत,” असा टोलाही लगावला.

नाशिकमधील ड्रग्स कारवाईच्या काळात परिवाराला लंडनला आणि आरोपींना दुबईला पाठवल्याचा आरोप करून त्यांनी संबंधित नोंदी तपासण्याची मागणी केली.बुलढाण्यातील बोगस मतदानाचा सर्वाधिक फायदा उबाठा आणि काँग्रेसला झाल्याचाही दावा केला.

शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावरील नोंद शिक्षकांनी केली असल्याचे सांगत त्यांनी स्वतःवरील आक्षेप फेटाळला.जावयाच्या कुटुंबाकडे इंग्रजांच्या काळापासून 700 एक्कर जमीन असल्याचे सांगून ठेकेदारीविषयक आरोपांनाही प्रत्युत्तर दिले.

पत्रकार परिषदेत दाखविलेल्या कथित डान्सबार व्हिडिओत राहुल सवडतकर आणि शाम पिसे असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. “माझ्याजवळ त्यांच्या घरातील प्रत्येकाचे व्हिडिओ आहेत; मी ते नीच धंदे करणार नाही. आधी स्वतःच्या घरात पाहा,” असे म्हणत त्यांनी दाम्पत्य महालेंवर निशाणा साधला.

ऋषभ,शिवराज,अन मुला बाबत म्हणाले…

महालेंचा भाऊ ऋषभ ड्रग्स,गांजा,चरस, आणि डायपर बाबत त्यांनी आरोप केले.दुसरा भाऊ शिवराज व मुलाचे व्हिडिओ दाखविण्याचा उल्लेख त्यांनी करत, “जास्त शहाणपणा शिकवू नका,” असा इशारा दिला.

दरम्यान, MPSC चे संपूर्ण बोर्ड बरखास्त करण्याची मागणी करत सतीश देशपांडे, देवानंद शिंदे, शैलेश देवनारकर आणि अभय वाघ यांच्या मालमत्तेची चौकशी व २०१८-२०२६ मधील कॉल तपशील तपासण्याची मागणी केली. संपत्तीत एक ते दीड हजार कोटींची वाढ झाल्याचा दावा करत प्रामाणिक सदस्य नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली

या केलेल्या आरोपांबाबत महिला भाजप आमदार श्वेता महाले यांच्या प्रतिक्रियेकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे  

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!