spot_img
spot_img

अमडापूर श्री बल्लाळ देवी मातेच्या नवरात्री उत्सवाची जय्यत तयारी! उत्सवावर मात्र दुष्काळाचे सावट!

उदयनगर (हॅलो बुलढाणा) येथून जवळच असलेल्या अमडापूर येथील ऐतिहासिक परंपरा, भक्तांची अपार श्रद्धा आणि श्री बल्लाळ देवीच्या दर्शनाची ओढ… या त्रिवेणी संगमाने पुन्हा एकदा देविचा यात्रा महोत्सव गजबजणार आहे! वार्षिक यात्रा उत्सवाला रविवार, ११ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होणार असून, धार्मिक सोहळ्यांच्या तयारीला वेग आला आहे. महाराष्ट्रासह राज्याबाहेरील भाविकही दरवर्षी श्रीं बल्लाळदेवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येथे येतात. दरवर्षी श्री बल्लाळ देवी संस्थासह अमडापूरकर हा नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असते. नऊ दिवस साजरा होणारा हा उत्सव यादरम्यान अनेक भक्त उपवास करतात. नऊ दिवस पायामध्ये चपला, बूट घालत नाहीत. नवरात्र उत्सवाचे जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. मदिरा समोरिल
प्रांगणात आकाश पाळने आपली जागा निश्चित करुन सामग्री जोडवा जोड करत आहे. तर इतर दुकानदारानी देखील आपल्या दुकानाचीजागा निश्चित केली आहे समोरील अमडापूर जानेफळ रोडचे काँग्रेटीकीकरणाचे काम मोठया वेगाने सुरु आहे. तर संस्थांच्या वतीने मंदिरावर झगमग लायटिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यंदा या नवरात्र उत्सवावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. नुकत्याच काही भागांमध्ये पापडया मध्ये वाळलेले सोयाबिन, सोगणीला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस पडला होता. पीक पाणी चांगले आले होते. यामुळे श्री बल्लाळ देवीच्या मातेच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांनी आनंदाने नऊ दिवस उत्सवात सहभाग घेतला होता. मात्र यंदा कोरडा दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यासह मजूर वर्गाचे बजेट कोलमडले असल्यामुळे या यात्रेवर आर्थिक, व कोरडया दुष्काळाचे सावट आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!