spot_img
spot_img

चिमुकल्या कलाकारांनी मैदानावर साकारला भव्य श्री गणेश! सातपुडा कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचा भन्नाट आविष्कार; मानवी साखळीतून गणरायाचे रूप, पाहणाऱ्यांच्या नजरा खिळल्या!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, उत्साह आणि सर्जनशीलतेचा जल्लोष! मात्र जळगाव जामोद येथील सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्स च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी यंदा गणरायाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना देत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शाळेच्या मैदानावर शेकडो विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मानवी साखळी उभी करून श्री गणेशाची भव्य आणि मनमोहक प्रतिमा साकारली आणि क्षणभर मैदानच जणू गणेशमय झाले!

रंगबेरंगी पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी अचूक नियोजनानुसार आपापली जागा घेतली. पाहता पाहता चिमुकल्यांची मानवी साखळी गणरायाच्या भव्य रूपात परिवर्तित झाली. ही प्रतिमा पाहताच उपस्थित पालक, शिक्षक आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला दाद दिली.

विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ कलाकृतीपुरता मर्यादित राहिला नाही. शिस्त, संघभावना, एकजूट, सर्जनशीलता आणि भक्तीभाव यांचा सुंदर संगम विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याने “एकत्र आलो तर भव्य काहीतरी घडू शकते,” हा संदेशही या उपक्रमातून प्रभावीपणे समोर आला.

शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्सकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच प्रत्यय या गणेशोत्सवातील अनोख्या उपक्रमातून आला

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!