रायपूर (हॅलो बुलढाणा/सचिन जैस्वाल)कबड्डीच्या मैदानात श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रायपूरच्या मुलींनी अक्षरशः दमदार खेळाचा ठसा उमटवला आहे. तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत Under-14 मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात प्रवेश केला, तर Under-19 मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेची वाट पक्की केली.
मैदानावर चपळाई, अचूक पकड, भक्कम बचाव आणि सांघिक खेळाचे जबरदस्त प्रदर्शन करत रायपूरच्या लेकींनी प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंजुळाई कोरडे पाटील ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. मीनाताई एकनाथराव कोरडे, सचिव एकनाथराव महादू कोरडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शुभम कोरडे व क्रीडा शिक्षक तुळशीदास अकाळ उपस्थित होते.












Total Users : 3477055