चिखली (हॅलो बुलढाणा) मौजे रायपुर येथील भारत गॅस एजन्सीकडून काळाबाजार होत असल्याचा आरोप आहे. या गॅस सिलिंडरच्या एजन्सीवर अचानक धाड टाकून तपासणी मोहीम राबवावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल वरवंडे यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.
मौजे रायपुर येथील भारत गॅस एजन्सीद्वारे ग्राहकांची लूट होत असून काळाबाजार होत असल्याचा आरोप राहूल वरवंडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.या संदर्भात
राहूल वरवंडे यांनी संबंधित प्रशासनाला गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबून ग्राहकांची लूट रोखण्याची मागणी यापूर्वी केली होती. परंतु जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेतले नसल्याचा आरोप वरवंडे यांनी केला आहे.तहसीलदारांनी याप्रकरणी त्वरीत दखल घेवून कार्यवाही करावी अन्यथा ३० सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.












Total Users : 3470107