spot_img
spot_img

EXCLUSIVE आ.गायकवाड विरुद्ध आ. महालेंच्या भांडणावर भाईजींची प्रेमळ फुंकर! म्हणाले.. भांडणांमध्ये काय पडलंय? हा तर फुकटचा तमाशाच! दोघेही बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे पण वादामुळे समाजाचे नुकसान! मतदार नाराज,आगामी निवडणुकीत पश्चातापाची येऊ शकते वेळ!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महायुतीचे शिंदेसेनाचे आ.संजय गायकवाड व भाजपाच्या आ.श्वेता महाले यांच्यात रंगलेल्या परस्पर शक्तीप्रदर्शन व शाब्दिक वाकयुद्धावर ‘बुलढाणा अर्बन’ चे सर्वेसर्वा राध्येश्याम चांडक ऊर्फ भाईजी यांनी प्रेमळ फुंकर घातली. परस्परांच्या मतदारसंघात ढवळाढवळ केल्यापेक्षा विकासाची ढवळाढवळ करण्याचा त्यांनी दोघांना सल्ला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आ.संजय गायकवाड विरुद्ध आ.श्वेता महालें यांच्यात शाब्दिक ठिणग्या पेटून वाद उफाळून येत आहे.’हम किसीसे कम नही’ अशी दोघांनीही तटस्थ भूमिका घेतलेली आहे. परंतु यामध्ये माघार कोण घेईल?समझोता कोण करेल?हा प्रश्न सुजाण नागरिक विचारत आहे.याच प्रश्नाला भाईजींनी प्रेमळ उत्तर दिले. भाईजी म्हणाले की, आ.गायकवाड व आ. महाले या​दोघांचा मी व ते माझे हितचिंतक आहेत. दोघेही आपापल्या मतदारसंघाचा पूर्ण विकास करू शकतात आणि ते करत आहेत. दोघांनी आपापल्या मतदारसंघामध्ये भरपूर निधी आणला व आणखी निधी आणतील. आ.गायकवाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत तर आ. श्वेता महाले ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जातात.त्यामुळे दोघेही आपापल्या मतदारसंघात विकासासाठी निधी आणतात. दोघेही बहुजन समाजाचे नेतृत्व करतात.परंतु यांच्या भांडणामुळे बहुजन समाजाचे खूप नुकसान होत आहे असं वाटते. भांडणांमध्ये काय पडलंय? हा तर फुकटचा तमाशा लोक बघताहेत, असेही भाईजी म्हणाले.

पुढच्या निवडणुकीत मतदार दोघांवरती नाराजी व्यक्त करतील दोघांना पश्चाताप करायची पाळी येईल,अशी शक्यताही भाईजींनी बोलताना व्यक्त केली. भांडणातून
काय मिळणार? काय साध्य होणार आहे? काही साध्य होणार नाही. बुलढाणा आणि चिखली विधानसभा मतदारसंघाची शांत व सुंदर संस्कृती आहे. त्यामुळे एकमेकांच्या मतदारसंघात ढवळाढवळ थांबवा, ढवळाढवळ करायची असेल तर विकास कामाची करा! आ.संजय गायकवाड यांनी चिखलीत विकास करावा तर आ.श्वेता महाले यांनी बुलढाण्यात विकास करून दाखवावा! असा सल्ला भाईजींनी यावेळी दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!