spot_img
spot_img

EXCLUSIVE आ.सिद्धार्थ खरात यांनी वेधले ८० च्या दशकातील ओरिजनल ‘लूक’वर लक्ष! म्हणाले.. ‘सन 2001 मध्ये असे होते डॉ.राजेंद्र शिंगणे साहेब अन् मी त्यांचा पीए! तोच वकूब कायम!

मेहकर (हॅलो बुलढाणा) जुन्या काळातील रंगीबेरंगी शर्ट, वेगवेगळी केशरचना-पोझ आणि जुन्या इमारतींचे वातावरण अशा भन्नाट वातावरणातील १९८० च्या दशकाचा ‘ट्रेंड’ सध्या फेसबूक, इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

पण सन २००१ मध्ये माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे साहेब अन् मी त्यांचा पीए! तोच वकूब कायम! त्यांच्याबद्दल नितांत आदर देखील कायम आहे.माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विकास कामाचा,
संघर्षाचा ओरिजनल इतिहास आहे, अशी अधोरेखीत केलेली आ.सिद्धार्थ खरात यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

अनेक जण आपली छायाचित्रे या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने बदलून ‘रेट्रो लूक’ देत आहेत. जुन्या काळाची भुरळ सर्वांनाच पडली असून, या छायाचित्रांच्या पोस्ट व त्यावरच्या प्रतिक्रियांनी सोशल मीडियाचे अवकाश सध्या व्यापून गेले आहे. अनेकांनी आपले फोटो ‘रेट्रो लूक’मध्ये तयार करून ते मित्र-परिवारासोबत शेअर करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अनेक लोकप्रतिनिधींनाही या ट्रेंडचा मोह सुटलेला नाही. मंत्री, आमदार, खासदार यांनीही या ट्रेंडमधील छायाचित्र काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. दरम्यान मेहकर- लोणार विधानसभा मतदारसंघाचे उबाठा शिवसेनाचे आमदार खरात यांनी आपले २००१ च्या दशकातील ओरीजनल फोटो शेअर करीत ‘जुने फोटो… साहेबांचा तोच वकूब.. साहेबांचा माझ्याकडून आजही तोच आदर कायम!’ ही फेसबूक पोस्ट करीत जिल्हावासियांचे लक्ष वेधून घेतले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!