spot_img
spot_img

सुंदरखेडमध्ये पहाटेपासून गर्दीच गर्दी… नेमकं काय होतं मंदिरात खास?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पहाटेपासून मंदिराकडे भाविकांची पावले वळू लागली… काही वेळातच “गण गण गणात बोते… जय गजानन, गुरु गजानन”चा जयघोष परिसरात घुमू लागला आणि राजमाता नगर, सुंदरखेड येथे भक्तीचे वेगळेच वातावरण निर्माण झाले. निमित्त होते श्री संत गजानन महाराजांच्या ११६ व्या पुण्यतिथी उत्सवाचे.

इतापे ले-आऊट येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात सकाळी सहा वाजता श्रींची विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. त्यानंतर भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्राचार्य रमेशराव वानखेडे यांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले.

श्री गजानन विजय ग्रंथातील विविध दाखले देत त्यांनी संत गजानन महाराजांचे कार्य, त्यांचा भक्तिमार्ग आणि जीवनाला दिशा देणारे संदेश उलगडून सांगितले. त्यांच्या ओघवत्या व सहज भाषेतील प्रवचनाने उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

त्यानंतर डॉ. अनंतराव सिरसाठ यांनी आभार मानले. श्रींना महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण करून भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. काला व नारळाचा प्रसाद वाटप झाल्यानंतर विष्णुपंत टिकार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.

पोळी, बेसन, शिरा, बुंदी आणि ठेच्याच्या महाप्रसादासोबत श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा संगम पाहायला मिळाला.श्री संत गजानन महाराज मंदिर समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि परिसरातील नागरिकांच्या सहभागामुळे संपूर्ण सोहळा उत्साहात पार पडला

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!