spot_img
spot_img

‘रस्ताच अडवते उपचाराची वाट!’ प्रशासनाला आणखी मृत्यूची प्रतीक्षा आहे का? आदिवासी बहुल भागात विविध सुविधांसह आरोग्याचा प्रश्न अधांतरीच! चाळीस टपरी ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध थोपटले दंड; अन्नत्याग आंदोलनाचा दिला इशारा!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) डोंगराळ पायवाट सुसज्ज रस्त्यात कधी बदलणार? या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी बहुल चाळीसटपरी गावातील ग्रामस्थांनी आता शासनाच्या आश्वासनाला बगल देत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. भिंगारा ते गोमाल रस्ता करून भिंगारा आरोग्य उपकेंद्रात 24 तास रुग्णवाहिका, सर्पदंश व श्वानदंश लसीसह अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी रेटली आहे.

रस्ते विकासाच्या वाहिन्या समजल्या जातात.परंतु स्वातंत्र्याचा 80 वा महोत्सव साजरा झाला तरी आदिवासी बहुल भागात आजही रस्ते नाहीत.जळगाव जामोद तालुक्यातील चाळीस टपरी गावात रस्त्या अभावी लोकप्रतिनिधी यांची उदासिनता व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत 4 जणांना जीव गमवावा लागला आहे.यापैकी नुकतेच सादुरी राधेश्याम खरात या गर्भवती महिलेला आपल्या तीन महिन्याच्या बाळासह बांबू आणि चादरची झोळी करून नेताना श्वास रोखावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली.त्यामुळे त्यांचे पती राधेश्याम खरात यांनी पुन्हा समाज माध्यमांसमोर सदर दुर्घटना मांडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, माझ्या पत्नीला सर्पदंश झाल्यानंतर रस्ता आणि वाहन उपलब्ध नसल्याने चादर व बांबूची झोळी करून खामगाव उपजिल्हा रुग्णालयात न्यावे लागले. तेथेही सर्पदंश लस उपलब्ध नव्हती. एक इंजेक्शन टोचून अकोलाकडे रवाना करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यामुळे पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.’ दरम्यान
भिंगारा ते गोमाल रस्ता करून भिंगारा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात 24 तास रुग्णवाहिका, सर्पदंश व श्वानदंश लसीसह अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी भेटली असून मागणी मान्य न झाल्यास २८ सप्टेंबर पासून ग्रामस्थांसह अन्यथा आंदोलन पूकारणार असल्याचा इशारा दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!