बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सामान्य नागरिकांसाठी कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्याचा सेवा गौरव होणे निश्चितच अभिमानाची बाब; मात्र ज्यांच्यावर महसूल अभिलेखांमध्ये कथित खोडतोड, बनावट सातबारे,लाखो रुपयांचे शासकीय महसुलाचे नुकसान आणि बेहिशेबी चल-अचल संपत्ती जमवल्याचे गंभीर आरोप आहेत, अशा नायब तहसीलदार विजय दत्तात्रय टेकाळे यांचा आज, १२ सप्टेंबर रोजी बुलढाण्यात ‘सेवानिवृत्ती व सेवा गौरव सोहळा’ आयोजित करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तक्रारदारांच्या दाव्यानुसार,टेकाळे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा येथे EO/04/Buldhana/2024 अन्वये उघड चौकशी सुरू आहे. याशिवाय ५२ अनोदनिकृत फेरफार मध्ये कथित खोडतोड,नियमबाह्य दिलेले बोगस सातबारे तयार करून लाखो रुपयांचे लाभ घेतल्याचे आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चल-अचल संपत्ती जमा केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.विभागीय चौकशी सुरू असतांना बुलढाणा शहरातील जांभरूण परिसरातील तब्बल 102 प्लॉट करोडो रुपयांचे नोंदी दुसऱ्यांच्या नावावर केल्याचाही गंभीर दावा तक्रारीत असल्याचे सांगितले जाते.या आरोपांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे ACB चौकशी सुरू असल्याचा दावा असताना टेकाळे यांची मंडळ अधिकारी पदावरून नायब तहसीलदारपदी पदोन्नती झालीच कशी? पदोन्नती प्रस्तावात चौकशीची माहिती नमूद करण्यात आली होती का? फाईलमधील संवेदनशील मुद्दा कुणाच्या सांगण्यावरून वगळला? आणि या पदोन्नतीवर नेमका कुणाचा ‘विशेष आशीर्वाद’ होता?
आज सायंकाळी अजिंठारोड स्थित व्हाईट रोज रिसॉर्टमध्ये होणाऱ्या सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेवर अनेक अधिकारी आणि राजकीय मान्यवरांची नावे असल्याची चर्चा आहे.त्यामुळे गंभीर आरोपांच्या सावटाखाली होणाऱ्या या ‘शाही सेंडऑफ’ला कोण-कोण हजेरी लावते,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे












Total Users : 3444776