spot_img
spot_img

IMPACT! ‘हॅलो बुलढाणा’चा दणका अन् आरोग्य यंत्रणा थेट देऊळगाव महीत! घराघरांत तापाचा शोध; दोन दिवसांत धूर फवारणीचा ‘अलार्म’!

देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) शहरात डेंगूसदृश तापाने थैमान घातले असताना आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या सुस्त कारभारावर ‘हॅलो बुलढाणा’ने आवाज उठवताच यंत्रणा अखेर खडबडून जागी झाली! जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांनी बातमीची तातडीने दखल घेत आरोग्य विभागाचे विशेष पथक शहरात पाठविले. शहरात पुढील दोन दिवसांत धूर फवारणी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

 

१२ सप्टेंबर रोजी जिल्हा हिवताप अधिकारी एस. बी. चव्हाण, सहाय्यक हिवताप अधिकारी बी. पी. होगे, कीटक समारक अनिल बिल्लारी, दीपक जाधव आणि आरोग्य सेवकांच्या पथकाने शहरात प्रत्यक्ष मोहीम सुरू केली. घराघरांत तापाचे सर्वेक्षण, पाणी साठविलेल्या भांड्यांची तपासणी, रक्त व पाण्याचे नमुने गोळा करणे आणि डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. प्रत्येक वॉर्डात तपासणी केली जाणार असून, परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत आरोग्य विभागाचे पथक शहरावर सातत्याने देखरेख ठेवणार आहे.

आढावा बैठकीनंतर आरोग्य विभागाने धूर फवारणीसाठी आवश्यक औषधांचा साठा ग्रामपंचायत प्रशासनाच्या ताब्यात दिला. शहरात पुढील दोन दिवसांत धूर फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र आश्वासन कागदावर न राहता प्रत्यक्ष प्रत्येक वॉर्डात फवारणी झाली पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे.

दरम्यान, शिवसेना नेते सिद्दिक कुरेशी, गणेश शिंगणे, रवींद्र इंगळे, तुळशीराम पंडित, रणजित खिल्लारे आणि निखिल शिंगणे यांनी आरोग्य पथकाला वाढत्या रुग्णसंख्येबाबत जाब विचारला. यावेळी सरपंच वासुदेव पाटील उपस्थित होते.‘हॅलो बुलढाणा’च्या वृत्तामुळे प्रशासनाला जाग आली; आता कारवाईचा वेग कायम राहणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!