बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील कारंजा चौक परिसरात ८ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या वादाला आता गंभीर वळण मिळाले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून भाजप नगरसेवक आकाश दळवी, प्रकाश गोरले यांच्यासह १० ते १२ जणांविरुद्ध मारहाण, तोडफोड, विनयभंग आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, गोगाजी महाराजांची मिरवणूक पाहून शर्मा कुटुंबीय रात्री सुमारे १० वाजता घरी परतले. कुटुंबीय जेवण करत असताना संशयित आरोपी घरासमोर आले. त्यांनी तेथे उभी असलेली मोटरसायकल खाली पाडून नुकसान केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या कुटुंबीयांनी दरवाजा बंद केला; मात्र आरोपींनी दरवाजा तोडून घरात प्रवेश करत पती, सासू-सासरे व मुलांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
वाद सोडविण्यासाठी महिला पुढे आली असता आकाश दळवी यांनी तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या आरोपांमधील सत्यता पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार असून, बुलढाणा शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.













Total Users : 3432442