spot_img
spot_img

गणेशोत्सवापूर्वी FDAचा अलर्ट! ‘भंडारा’ करण्यापूर्वी हे नियम वाचाच..!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. अनेक मंडळांकडून हजारो भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. याशिवाय मंदिरांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांत, यात्रा आणि उरुसाच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर अन्नवाटप केले जाते. मात्र, मोठ्या संख्येने नागरिकांना अन्न देताना त्याची गुणवत्ता आणि स्वच्छता अबाधित राहावी, यासाठी आता अन्नऔषध प्रशासनाने विशेष नियमावली जाहीर केली आहे.

महाप्रसाद, भंडारा, अन्नछत्र किंवा लंगराचे आयोजन करणाऱ्या संस्थांना यापुढे कार्यक्रमाचे नियोजन करताना अन्नसुरक्षेच्या नियमांचा विचार करावा लागणार आहे. सामूहिक अन्नवाटपाचा कार्यक्रम असल्यास त्याची माहिती किमान सात दिवस आधी प्रशासनाला देणे अपेक्षित आहे. गणेश मंडळ किंवा इतर आयोजकांनी अन्न तयार करण्यासाठी परवानाधारक अथवा नोंदणीकृत केटररची निवड केल्यास संबंधित कार्यक्रमाची पूर्वमाहिती प्रशासनाकडे सादर करावी लागेल.यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यात माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे कार्यक्रम कुठे, कधी आणि कोणत्या पद्धतीने आयोजित केला जात आहे, याची माहिती FDAला आधीच उपलब्ध होणार आहे. महाप्रसादासाठी अन्न बनवताना केवळ पदार्थ चांगले असणे पुरेसे नसून त्याच्या हाताळणीवरही लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्वयंपाकासाठी वापरले जाणारे पाणी सुरक्षित असावे. कच्चा माल आणि तयार अन्न एकमेकांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्न योग्य तापमानात ठेवावे आणि साठवणुकीचीही योग्य व्यवस्था करावी. तसेच स्वयंपाक करणाऱ्या आणि अन्न वाढणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक राहणार आहे. गरज भासल्यास अन्नाचे नमुनेही घेतले जातील. तपासणीमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.

▪️सण कोणता, त्यानुसार FDAचे नियोजन!

दरम्यान, सणांच्या काळात काही खाद्यपदार्थांची मागणी अचानक वाढत असल्याने भेसळीचा धोका लक्षात घेऊन FDAने वर्षभरासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. त्यासाठी सण आणि धार्मिक कार्यक्रमांचे तीन गट करण्यात आले आहेत. राज्यभर मोठ्या प्रमाणावर साजरे होणारे सण पहिल्या गटात आहेत. यामध्ये गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्येचा समावेश आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!