चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) भरधाव वेगातील मालवाहू पिकअपने दुचाकीला जोरदार धडक देत एका युवकाचा जागीच बळी घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी चिखली-मेहकर रोडवरील बंजारा हॉटेल समोर घडली. या भीषण अपघातात विनोद एकनाथ चेके (वय ३७, रा. देऊळगाव घुबे, ता. चिखली) यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद चेक हे जळगाव घुबे येथून मेहकरकडे दुचाकीने जात असताना सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव मालवाहक पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, विनोद चेक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीएसआय शरद भागवतकर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत हे पुढील तपास करीत आहेत.











