spot_img
spot_img

अवैध दारू विक्रेत्यावर चिखली डी.बी. पथकाची धडक कारवाई; 7,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लागू असलेल्या दारूबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने जोरदार कारवाई करत अवैध दारू विक्रेत्याला रंगेहाथ पकडले आहे.

दि. 14/04/2026 रोजी पोलीस स्टेशन चिखली हद्दीत अवैध दारू व जुगारविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. गुप्त माहितीच्या आधारे गौरक्षणवाडी परिसरात एका इसमाकडून देशी दारूची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची खात्रीलायक माहिती डी.बी. पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ सापळा रचून छापा टाकला.

कारवाईदरम्यान आरोपी रवि मधुकर नाटेकर (वय 38, रा. सिद्धार्थनगर, चिखली) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील दोन कापडी पिशव्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता ‘सखु संत्रा’ कंपनीच्या 90 मि.ली. क्षमतेच्या एकूण 188 देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 7,600 रुपये इतकी आहे.

सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाने केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!