spot_img
spot_img

होमगार्ड आत्माराम वखरे यांना अश्रूंनी निरोप; कर्तव्य बजावताना मृत्यूने हळहळले सवना!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) शासकीय टपाल घेऊन बुलढाणा जात असताना अज्ञात मालवाहू पिकअपने दिलेल्या भीषण धडकेत होमगार्ड आत्माराम वखरे यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 13 एप्रिल रोजी घडली होती. कर्तव्य बजावत असतानाच मृत्यू ओढवल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सवना (ता. चिखली) येथे शासकीय इतमामात वखरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. कुटुंबियांचा आक्रोश आणि सहकाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.

अंत्यसंस्कार ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. पोलीस उपनिरीक्षक शरद भागवत, उपनिरीक्षक राजू सुसर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद ब्राह्मणे, सुनील राजपूत, प्रदीप मांडे तसेच होमगार्ड विभागाचे अधिकारी साळोक साहेब व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, अपघातानंतरही आरोपी वाहनचालक फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. कर्तव्यावर असलेल्या जवानाचा बळी जाणे अत्यंत दुर्दैवी असून दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!