देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/संतोष जाधव) गल्लीमध्ये अनेकांच्या अंगा-खांद्यावर खेळणारी,सर्वांची लाडकी दोन वर्षीय निरागस ईश्वरी अंकुश हरणे रा. त्र्यंबकनगर या चिमुकलीचा काल दि. 3 जुलै रोजी सायंकाळी पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळची वेळ असल्यामुळे ईश्वरीची आई घरातील काम करत होती. ईश्वरी समोरच्या हॉलमध्ये बसलेली असतांना खेळत खेळत ती अचानक ती बाहेर निघून गेली. दोन तास ईश्वरीचा शोध घेऊन सुद्धा ती मिळत नसल्याने अखेर नातेवाईकांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला धाव घेतली. या घटनेची प्रभारी ठाणेदार आशिष रोही यांनी तात्काळ दखल घेऊन घटनास्थळी धाव घेत पोलिसांचा फौजफाटा घेऊन चौकशी सुरू केली. आजूबाजूला असलेल्या पाण्याच्या हौदाची पाहणी करत असतांना पाण्याच्या हौदातचं ईश्वरीचा मृत्यूदेह आढळून आला. तीला देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले. परंतु तीची प्राणज्योत माळवली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे.
- Hellobuldana