बुलढाणा (हॅलो बुलडाणा) खाद्यपदार्थ शोधत असलेला एक अस्वल आणि शेतकरी यांच्यात अचानक भिडत झाली अन् अस्वलाने शेतकऱ्याला गंभीर जखमी करून टाकले.हा थरार करवंड येथील शेतात घडला आहे.
करवंड येथील ताराचंद सिताराम चव्हाण यांच्यावर शेतीमध्ये अस्वल हल्ला झाला झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. ते शेतात काम करण्यासाठी गेले असता, दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर प्राणघातकी हल्ला केला.ताराचंद सिताराम चव्हाण यांनी देखील अस्वलाशी दोन हात केले.परंतु ताकदवान असलेला अस्वल ताराचंद यांचेवर भारी पडला. अस्वलाने त्यांच्या अंगावर अनेक जखमा केल्या.
अस्वलांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार त्यांची पिलेही जंगलक्षेत्रातील अत्यंत गोंधळ घालणारी, द्वाड असतात. गुरगुरणे, रेकणे किंवा डुरकणे, कर्कश किंचाळणे, चिडचिड आणि जोराने घेतल्या जाणार्या श्वासांचे आवाज अस्वलांचे अस्तित्व असणार्या जागांजवळ सहज ऐकू येतात. अलीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अस्वलांचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे गरजेचे असून वन विभागाने सुद्धा याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.