spot_img
spot_img

अंढेरात खळबळ! पोलिसाला सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

अंढेरा (हॅलो बुलडाणा) देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा परिसरात धक्कादायक घटना घडली असून निलंबित पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या सासू-सासऱ्यांनीच घरात घुसून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभू चाटे (मुंबई पोलीस दलातील निलंबित कर्मचारी) हा काही दिवसांपूर्वी अंढेरातील आपल्या घरी परतला होता. याच दरम्यान त्याच्या सासू-सासऱ्यांनी थेट त्याच्या घरी धाव घेत घरात घुसून त्याला बाहेर ओढले आणि कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी प्रभू चाटे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहितीही समोर आली आहे. याच प्रकरणातून निर्माण झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याची चर्चा आहे. याआधीच त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचीही माहिती मिळते.

या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात सासू-सासरे तसेच मेहुण्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!