spot_img
spot_img

जालिंदर बुधवतांना विधानसभेचे तिकीट भेटणार? -खासदार संजय राऊत यांनी थोपाटली पाठ!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जालिंदर बुधवत यांनी सध्या भगव्या वादळाचे रूप धारण केलं आहे.पायाला भिंगरी लावून भगवा सप्ताह पूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.अशाच विरोधकांची चांगलीच गोची होत असून, त्यांच्याकडे आरोप करण्या पलीकडचे पर्याय नाहीत. परंतु हे आरोप तक्रारी त्यांच्या चांगल्या कार्याची पावती आहे. विधानसभा निवडणुकीत बुधवत यांनाच भेटणार असल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. संजय राऊत शेगाव येथे आले असताना त्यांनी बुधवंत यांची पाठ थोपाटली.दरम्यान अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवत यांच्या तक्रारींचा पाढा वाचलाच नाही तर तक्रारीचा लेटर बॉम्ब त्यांच्या हातात सोपवला.परंतु या तक्रारीत तथ्य नसल्याचे स्वतः बुधवत यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना स्पष्ट करून सांगितले.

जालिंदर बुधवत यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे.बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदारांचा पराभव केला.शिंदे गट व उबाठा गट अशी शिवसेनेत फूट पडल्यानंतर उबाठा गटाची धुरा जालिंदर बुधवत यांनी सांभाळली.पहिली सभा त्यांनीच घेतली होती.ते डगमगले नाहीत.त्यांना शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे वर प्रचंड आत्मविश्वास होता.या सर्व गोष्टी उद्धव ठाकरे यांना माहित आहेत.दरम्यान संजय राऊत शेगाव येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आले असता,त्यांना अनेक विरोधकांनी आयडिया दिल्यावर उबाटा शिवसेनेतीलच असंतृष्ट कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जालिंदर बुधवत यांच्या तक्रारी केल्या आहेत.परंतु सोनं हे सोनं असतं! रत्नपारखी हवा..या न्यायाने संजय राऊत यांनी जालिंदर बुधवत यांना पुढील कार्य सुरू ठेवा असे सांगितले.शिवाय विधानसभा निवडणुकीची तिकीटही जालिंदर बुधवत यांना मिळू शकते असाही संकेत यावेळी मिळाला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!