बिबी (हॅलो बुलढाणा/मोईन खान) शेतात घाम गाळून काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजावर विजेनेच मृत्यूचा घाला घातला! कापसाच्या पिकाला पाणी देताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. डीपीचा फ्युज तपासण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बिबी शिवारात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसर हादरला आहे.
लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर येथील गोविंद आयदान राठोड हे शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता बिबी शिवारातील गट क्रमांक ३८८ मधील शेतात कापसाला पाणी देत होते. अचानक वीज गेल्याने ते डीपीजवळ पोहोचले. फ्युज काढून तपासत असतानाच विजेचा तीव्र झटका बसला. राठोड जागीच कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मृतकाचे मेव्हणे संजय टोपा राठोड यांनी बिबी पोलिसांना दिली. पोलिसांनी मर्ग क्रमांक २७/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण करीत आहेत






Total Users : 3628126