spot_img
spot_img

BIG POLITICAL! शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसाठी उद्धव ठाकरेंचा ‘शब्द’ अन् लहाने सरांची ‘शपथ’! अमरावती शिक्षक मतदारसंघात राजकीय भूकंप? ‘लहाने यांच्या पाठीशी उभे राहा, जुनी पेन्शन लागू करू!’ ठाकरेंचे भावनिक पत्र; आमदारकीचा पगार नाकारण्याच्या प्रतिज्ञेने निवडणुकीत नवा ट्विस्ट!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा विशेष) अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता जुन्या पेन्शनचा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट शिक्षकांना भावनिक पत्र लिहून प्रा. दत्तात्रय लहाने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. जुन्या पेन्शनसह नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदान लागू करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

‘मुख्यमंत्री असताना शब्द दिला होता; गद्दारीमुळे वचनपूर्ती रखडली!’

मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना आंदोलनाशिवाय कर्जमुक्त केल्याचा दावा करत ठाकरे यांनी शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्नही निकाली काढण्याचे लेखी मान्य केले होते, असे पत्रात नमूद केले. मात्र, काही आमदारांच्या गद्दारीमुळे वचनपूर्ती करता आली नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. दिलेल्या शब्दाला जागणे हाच शिवसेनाप्रमुखांचा संस्कार असल्याचेही त्यांनी ठणकावले!

‘पेन्शन मिळेपर्यंत आमदारकीचा पगार घेणार नाही!’

या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरतोय तो लहाने यांचे शपथपत्र! शिक्षकांना जुनी पेन्शन आणि नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदान लागू होईपर्यंत आमदार म्हणून मिळणारे वेतन स्वीकारणार नाही, अशी लेखी प्रतिज्ञा त्यांनी तहसीलदारांसमक्ष केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. लहाने यांच्या या भूमिकेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

आता शिक्षकांचा कौल कुणाला?

यापूर्वी निवडून गेलेल्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी नेमके काय केले, असा सवाल उपस्थित करत ठाकरे यांनी लहाने यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले.

एकीकडे जुन्या पेन्शनचा प्रलंबित प्रश्न, दुसरीकडे वेतन नाकारण्याची प्रतिज्ञा आणि आता ठाकरेंची थेट भावनिक साद! त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणुकीचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!