spot_img
spot_img

पळसखेडमध्ये पाणीचोरांना दणका; मोटारी जप्त!

पळसखेड (हॅलो बुलढाणा) एकीकडे पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे लपा योजनेतील पाण्यावर अवैध उपसा करणाऱ्यांना प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे! शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी मौजे पळसखेड येथे भरारी पथकाने अचानक धडक देत अवैध पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी जप्त करण्याची धडक कारवाई केली. या कारवाईमुळे नियमबाह्य पाणी उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत!

पळसखेड येथील लपा योजनेच्या पाण्याचा काही शेतकऱ्यांकडून अवैध उपसा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे भरारी पथक थेट मैदानात उतरले. पथकाने कारवाई करत संबंधित मोटारी जप्त केल्या. त्यामुळे पाण्याचा अनधिकृत वापर करणाऱ्यांना प्रशासनाने कडक संदेश दिला आहे.

या कारवाईवेळी नोडल अधिकारी गोपाल सुरडकर, सहाय्यक नोडल अधिकारी पिंपळे सर, पळसखेड भटच्या ग्रामसेविका मोरे मॅडम, तलाठी इंगळे मॅडम, ग्रामसेवक मानकर, तलाठी राठोड, सरपंच तरमळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!