जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) शेतात राबराब राबून पिकवलेलं सोयाबीन घरात येण्याआधीच आगीच्या भक्ष्यस्थानी! जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द शिवारात अज्ञात व्यक्तीने सोयाबीनच्या गंजीला आग लावल्याच्या तक्रारीने खळबळ उडाली आहे.
बोराळा खुर्द येथील शेतकरी राहुल शत्रुघ्न वाघ (वय ३३) यांच्या गट क्रमांक २१३ मधील दोन एकर शेतातील सोयाबीनची गंजी आणि बाजूलाच ठेवलेले धनुका कंपनीचे स्प्रिंकलर पाइप आगीत जळून खाक झाले. या घटनेत तब्बल १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. १६ ऑक्टोबरच्या सायंकाळी सहा ते १७ ऑक्टोबरच्या सकाळी ७.४५ वाजेदरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ६५७/२०२६, BNS कलम ३२६(एफ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविकांत बावस्कर करीत आहेत






Total Users : 3629792