खामगाव (हॅलो बुलढाणा) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेतृत्व संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून ११ ऑगस्ट रोजी संत गजानन महाराजांच्या पालखीतील वारकरी व भाविकांना फराळ, दूध, पाणी वाटप आणि खामगाव- शेगाव पालखी मार्गावरील स्वच्छता करीत सेवाकार्य करण्यात आले.
पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव येथे परतली. दरवर्षी खामगाव येथून लाखो भाविक पायदळ वारीत सहभागी होतात. हा अदभुत सोहळा डोळ्यात साठवण्यासारखा असतो. उबाठाचे युवा नेतृत्व संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून वारकरी आणि भाविकांना फराळ, पाणी, दूध वाटप करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते. मोठ्या संख्येने वारकरी व भाविकांनी फराळ, दूध पाणी वाटप सुविधेचा लाभ घेतला. खामगाव- शेगाव पालखी मार्गावर साफसफाई करीत स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.