चांडोळ (हॅलो बुलढाणा / सलमान नसीम अत्तार) आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यापुढाकाराने पंचायत समिती अंतर्गत बांधकाम मजुरांना संसार भांडे किटचे वाटप करण्यात आले.हा लाभ जवळपास 1058 जणांना मिळाला आहे.परंतु अनेक लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.
चांडोळ पंचायत समीती अंतर्गत येणाऱ्या चांडोळ,इरला, बोदेगांव,ढगारपूर, मसाला बु, म्हसल खु, मोंढाला, जांब,या गावातील एक हजार अठ्ठावण बांधकाम मजुरांना लाभ भेटला आहे. अनेक दिवसा पासून या योजने साठी कामगार वंचित होते. झालेल्या लोकसभा निवडणूक व आचारसंहितेमुळे योजना रखडली होती. आमदार सौ. श्वेता ताई महाले यांच्या प्रयत्नमुळेआता 1058 मजुरांना कीट मिळाली आहे. अजून बरेच मजुराचे कार्ड रिन्यूअल साठी बाकी आहे ते कधी रिन्युअल होतात ? जर हे फॉर्म वेळेवर रिन्युअल नाही झालेत तर येणाऱ्या विधानसभा च्या अनुषंगाने आचारसंहिता लागली तर किट वाटप करता येणार नाही,हे विशेष!