spot_img
spot_img

वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली! सततची नापिकी व दोन लाखाच्या कर्जामूळे कुटुंबाचा आधार हरवला!

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/ सादिक शेख) मोताळा तालुक्यातील रिधोरा शिवारात 63 वर्षीय शेतकऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी पहाटेपूर्वी घडली.मृतक

शेतकऱ्याकडे 4 एक्कर शेती असून, दोन लाख 4 हजार रुपये कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे. कुटुंबाचा कर्ता हरविल्याने मुलगा व पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रभाकर प्रल्हाद कानडजे (वय 63, रा. रिधोरा, ता. मोताळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.या प्रकरणी रिधोरा येथील दिपक दामोदर कानडजे यांनी पोलिसांत माहिती दिली. माहितीनुसार, मृतकाचा मुलगा गोपाळ प्रभाकर कानडजे हा गावाशेजारील गोठ्यावर झोपलेला असताना त्याला जाग आली. त्यावेळी प्रभाकर कानडजे हे घरातून दूध काढण्यासाठी बादली घेऊन गोठ्यावर आले होते. मात्र, काही वेळाने ते दिसून न आल्याने मुलाने परिसरात शोध घेतला.
शोध घेत असताना रिधोरा-पोखरी रस्त्यावर गोठ्यापासून सुमारे 100 मीटर अंतरावर, शंकरलाल मिश्रीलाल जैस्वाल यांच्या शेताच्या धुऱ्यावर लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रभाकर कानडजे आढळून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली.
या प्रकरणी धामणगाव बढे पोलिस ठाण्यात मर्ग क्र. 31/2026, कलम 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस ठाण्याच्या आदेशानुसार पुढील तपास बीट जमादार शैलेंद्रसिंग राजपूत (ब. नं. 1976) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!