spot_img
spot_img

EXCLUSIVE भाईजींच्या निशाण्यावर ‘लक्ष्य’… बाजूला ठाणेदार संग्राम पाटील! सहकार विद्या मंदिरात घुमला ‘एक गोळी, एक दुश्मन’चा मंत्र!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बंदूक हातात आली म्हणजे केवळ नेम साधला जात नाही; त्यासाठी एकाग्रता, संयम, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा लागते! याच गुणांची शिदोरी विद्यार्थ्यांना देण्यासाठी सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे उभारण्यात आलेल्या NCC फायरिंग रेंज वॉलचे ११ सप्टेंबर रोजी १३ महाराष्ट्र बटालियन, खामगावचे कर्नल ओमेश शुक्ला यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी NCC कॅडेट्सनी फायरिंगचे प्रात्यक्षिक सादर करत देशसेवेचा बुलंद प्रण घेतला.

 

कार्यक्रमाला बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक तथा भाईजी, निवृत्त कर्नल सुहास जतकर, बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील, बुलढाणा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कोमल झंवर आणि जिल्हा युवा अधिकारी दिशा पोमन यांची प्रमुख उपस्थिती होती.

राधेश्याम चांडक यांनी ‘अनुशासन आणि एकता’ हे NCCचे ब्रीदवाक्य आजच्या ‘Gen Z’ पिढीसाठी यशाचा मुलमंत्र असल्याचे सांगितले. यशस्वी व्यक्ती होण्यापेक्षा जबाबदार भारतीय नागरिक होणे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कर्नल ओमेश शुक्ला यांनी फायरिंग प्रशिक्षणामध्ये बंदुकीच्या वापराबरोबरच संयम, एकाग्रता आणि शिस्तीची खरी परीक्षा होत असल्याचे स्पष्ट केले. फायरिंग रेंजच्या उभारणीसाठी सहकार्य करणारे माजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

यावेळी ऋग्वेदा सराफ, स्वरा जाधव आणि वैजयंती वाघ यांना NCC सार्जंट रँक प्रदान करून गौरविण्यात आले. ‘I Support NCC’ स्वाक्षरी अभियानासह वृक्षारोपण करण्यात आले. सुभेदार कमल थापा, नागो राठोड, हवालदार युवराज तमांग यांच्यासह अधिकारी, शिक्षक आणि NCC कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा खिल्लारे व विशाल सोनोने यांनी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!