spot_img
spot_img

सरकारने तुपकरांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास अधिकही तीव्र आंदोलन करू – अक्षय पाटील

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) शेतकरी नेते तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ दिनांक 17/6/2026 रोजी अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी चढुन आक्रमक आंदोलन केले.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती हक्काचा पिक विमा मिळावा या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासुन बुलढाणा येथे रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलन करीत आहे.
या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरताना दिसत आहे. मात्र सरकार चा एकही प्रतिनिधी आंदोलन स्थळी न गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अशी नाराजी आहे.
तरी शासनाने रविकांत तुपकर यांच्या मागण्यांना विचारात घेऊन त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा विचार करावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व पिक विमा द्यावा यासाठी जळगाव जामोद येथे युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी जळगाव जामोद तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चढुन तीव्र आंदोलन केले याप्रसंगी तहसील परिसरीसर घोषणांनी दणाणून गेला होता. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक १४ जून ते २८ जून २०२६ या कालावधीसाठी कलम ३७ (१) (३) अन्वये जमावबंदी लागू आहे. प्रशासनाचे हे आदेश पायदळी तुडवून तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी केल्याप्रकरणी पोहेकों निलेश रामदास पुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये जळगांव जामोद
पोलीस स्टेशनमध्ये अप क्र. ३८१/२०२६ नुसार कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये खालील आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे:अक्षय दामोदर भालतडक (वय ३८),वैभव गुणवंत जाणे (वय ३६),सदानंद शिवाजी जाणे (वय ३०,अजय शिवहर भालतडक (वय ४०),तुषार गजानन भालतडक (वय ३८),अनिलसिंग उदयसिंग सोळके (वय ४२),सोपान किसन भालतडक (वय ३४),शिवदास तुळशीराम खिरोडकर (वय ४४),संतोष सावजी गणगे (वय ३८)
यांसह अन्य ३ ते ४ अज्ञात व्यक्ती असून
​सदर प्रकरणाचा पुढील तपास पोहेकों संजय वेरुळकर हे करत आहेत. या घटनेमुळे आज तहसील परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!