देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/ संतोष जाधव) तालुक्यातील ायगाव बुद्रुक येथे घडलेल्या गंभीर जबरी चोरी प्रकरणाचा अंढेरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पर्दाफाश केला आहे. मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तातडीने हालचाल करत तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याची लगडी 78.570 ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे 4,77,000 रुपये तसेच एकूण 5,38,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि एक मोटरसायकल यांचा समावेश आहे.
अटक आरोपींमध्ये रवी प्रदीप पवार (21, रा. मोटेगाव, रिसोड), निलेश/ईलेश जगन शिंदे (25, रा. धानोरी, चिखली) आणि उमेश जगन शिंदे (23, रा. धानोरी, चिखली) यांचा समावेश आहे.
या प्रकरणात अंढेरा पोलिस स्टेशनमध्ये अप. क्र. 81/2026 अंतर्गत BNS कलम 309(6), 333, 127(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार API रुपेश शक्करगे यांच्या नेतृत्वाखाली PSI दिनेश घुगे व पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारीला मोठा आळा बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.











