spot_img
spot_img

सातगावात मद्यधुंद तरुणाची दादागिरी; पोलिसांचा चाप बसला!

धाड (हॅलो बुलडाणा) चिखली तालुक्यातील सातगाव म्हसला येथे एका मद्यधुंद तरुणाची दादागिरी अखेर पोलिसांच्या कारवाईमुळे थांबली आहे. वारंवार दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ करून नागरिकांना त्रास देणाऱ्या ज्ञानेश्वर एकनाथ मुजमुले (वय ३३) याच्याविरुद्ध धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश केशरसिंग राजपूत यांच्या घराजवळ राहणारा आरोपी हा शासकीय जागेवरील अतिक्रमणाच्या वादातून सतत वाद घालत होता. विशेष म्हणजे यापूर्वीही त्याच्याविरुद्ध दोन वेळा NC नोंदी करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही त्याच्या दादागिरीत कोणतीही घट झाली नव्हती.

१६ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपी पुन्हा दारूच्या नशेत फिर्यादीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व आरडाओरडा करू लागला. समजावण्याचा प्रयत्न करताच त्याने मारहाणीचा प्रयत्न केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच धाड पोलीस तात्काळ दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत तो मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले.याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!