spot_img
spot_img

मिशन परिवर्तनचा धडाका! बुलढाण्यात महिलांना स्वसंरक्षणाचे शस्त्र हाती

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आता बुलढाण्यात भीती नव्हे, प्रतिकार असा ठाम संदेश देत मिशन परिवर्तन अंतर्गत स्वसंरक्षण शिबिराची दमदार सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस दल, महिला व बालकल्याण विभाग आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने म्हाडा कॉलनी परिसरात सुरू झालेल्या या शिबिरात महिलांना थेट मैदानात उतरवून लाठी-काठी, दांडपट्टा आणि कराटेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला व बाल संरक्षण अधिकारी वसु साहेब प्रमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे, 60 पेक्षा अधिक महिला आणि मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेत शिबिराला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!