spot_img
spot_img

डिजिटल जनगणनेसाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे – तहसीलदार निलेश मडके

डोणगाव (हॅलो बुलडाणा/ अनिल राठोड) महसूल विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी ऑनलाईन प्रणालीला नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार निलेश मडके यांनी केले.

दि. १७ एप्रिल रोजी ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात विविध विभागांच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यात आल्या. शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मडके होते, तर माजी सभापती राजेंद्र पळसकर, कृषी अधिकारी विजय राजूरकर, ठाणेदार अमरनाथ नागरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्रास्ताविकातून ग्राम महसूल अधिकारी पल्लवी गुंठेवार यांनी शिबिराची माहिती दिली.

या शिबिरात कृषी, आरोग्य, अन्न पुरवठा, पोस्ट, महा ई-सेतु आदी विभागांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, रेशन कार्ड आदींचे वितरण करण्यात आले.

महसूल विभागाच्या सेवा जनतेपर्यंत सुलभतेने पोहोचाव्यात आणि नागरिकांचा त्रास कमी व्हावा, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे मडके यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!