spot_img
spot_img

दगडवाडी (ता. देऊळगावराजा) येथे भीषण आग – लाखोंचे नुकसान, 7 जखमी; मोठा अनर्थ टळला

देऊळगावराजा (हॅलो बुलडाणा) दगडवाडी येथे शुक्रवार, 10 एप्रिलच्या मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे एका घराला अचानक भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

शेजारील नागरिक सौंदा उगलमुगले यांनी धूर आणि ज्वाळा दिसताच तत्काळ गावकऱ्यांना सतर्क केले. सरपंच पती यांनी तातडीने पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्याशी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचारण केले. अवघ्या 15 ते 20 मिनिटांत अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली.

दरम्यान, गावकऱ्यांनी सुरुवातीला बाटल्या व पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी घरातील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात घरावरील पत्रे व मोठमोठे दगड दूरवर फेकले गेले, ज्यामुळे मदत करणाऱ्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

या घटनेत आर्यन शंकर घुगे याला डोक्याला गंभीर दुखापत होऊन 18 टाके पडले, तर इतर सहा जण किरकोळ जखमी झाले. घरातील धान्य, कागदपत्रे, कपडे व इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अग्निशामक दल आणि पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे आग आटोक्यात आली व पुढील मोठा अनर्थ टळला. घर मालक कारभारी दिपाजी नागरे यांचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. गावात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!