खामगाव (हॅलो बुलडाणा) निमगाव फाटा ते बेलाड रोडदरम्यान आज दुपारी भीषण अपघात घडला. पॅसेंजर ऑटो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत व पुढील तपास सुरू आहे.(जखमींची नावे कळू शकली नाही)











